Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Mi Punha Yein :'मी पुन्हा येईन'वरून फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, "एखादा Video दाखवून कुणी सत्तेत..."

BJP Political News : या ट्विटमधून कुणाला काय संदेश द्यायचा होता, ते ते साध्य झाले का? अशी चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Mangesh Mahale

Mumbai Latest News : भाजपच्या टि्वटर हॅंडलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हे वाक्य असलेला व्हिडिओ टि्वट केला होता, तासाभरात तो डिलीट करण्यात आला. या टि्वटवरून राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरू असताना फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"एखादा व्हिडिओ दाखवून कुणी सत्तेत येत का? असा सवाल करीत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. आगामी निवडणुका या त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार आहे. त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ एकाही दिवसाने कमी होणार नाही, असे फडणवीस म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाच्या एका तासानंतर भाजप महाराष्ट्राने ते ट्विट डिलीट केले. परंतु, या ट्विटमधून कुणाला काय संदेश द्यायचा होता, ते साध्य झाले का? अशी चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तासाभरातच व्हिडिओ डिलिट

2019 च्या निवडणुकीवेळी मी पुन्हा येईन, असा फडणवीसांनी दिला होता. त्यानंतर या त्यांच्या नाऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा होते आहे. शुक्रवारी भाजपकडून फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला. तासाभरात तो डिलीट करण्यात आला. त्यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. हे ट्विट सहज केलं नसल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. आपण पुन्हा येणार नाही, हे फडणवीसांना कळल्यानंतर त्यांनी ते टि्वट डिलीट केले असावे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT