Sharad Pawar , Sadabhau Khot  sarkarnama
मुंबई

Sadabhau Khot : पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव ; फडणवीसांनंतर आणखी एका नेत्याचा आरोप

Sadabhau Khot on Sharad Pawar News : सदाभाऊ खोत यांनी शेतराखणीचे उदाहरण देत पवारांवर निशाणा साधला आहे.

सरकारनामा ब्युरो

Sadabhau Khot on Sharad Pawar News :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसापूर्वी 'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी एक राजकीय खेळी असू शकते,; असा दावा केला होता, यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. फडणवीसांनी नुकताच याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पूर्ण कल्पना होती, किंबहुना त्यांच्या संमतीनंच सगळं झालं होतं’, असा दावा फडणवीस यांनी नुकताच केला आहे.यावर भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अजित दादा निर्णयच घेऊ शकत नाहीत

सदाभाऊ खोत यांनी या शपथविधीचे वर्णन खास आपल्या ग्रामीण शैलीत करीत टोला लगावला आहे. "शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथ विधी होऊ शकत नाही कारण अजित दादा निर्णयच घेऊ शकत नाहीत,"असे सांगत खोत यांनी शेतराखणीचे उदाहरण देत पवारांवर निशाणा साधला आहे.

पाखरं अचानक हल्ला करतात..

"शेतामध्ये जेव्हा पीक येतं तेव्हा पीक आल्यानंतर तिथे राखण्या बसवला जातो. राखण्या पाखरांना येऊ देत नाही, मग पाखरांना प्रश्न पडतो की दाणे कसे खायचे. पाखर हुशार असतात ते १,२ दिवस शेतात येत नाहीत अन् राखण्याला वाटतं आता पाखर येणं बंद झाली आणि तो पण झोपून जातो, पण अचानक ही पाखरं येतात हल्ला करतात आणि दाने खाऊन जातात," असे सदाभाऊ खोत म्हणाले.

'राखण्या' गेला अन् दुसऱ्या दिवशी ..

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा पवारसाहेबांना कळले की आता आपल्याला थोडं शांत राहावं लागेल. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाल्यांना सांगितलं की मी येतो तुमच्या बरोबर.अजितदादा येतील, घ्या उद्या शपथविधी. राष्ट्रपती राजवट उठवली आणि 'राखण्या' गेला की बरोबर दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांनी शिवसेनेला आणि काँग्रेसला घेऊन सरकार बनवलं," असा टोला खोतांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT