rohit pawar,sadabhau khot
rohit pawar,sadabhau khot sarkarnama
मुंबई

रोहित पवारांच्या त्या टि्वटला सदाभाऊ खोतांनी दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. ठाण्याच्या उत्तरसभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले होते. त्यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar)यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत निशाणा साधला होता. ''शरद पवार, अजित दादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखे आहे,'' असे रोहित पवार यांनी म्हटलं होतं. भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot)यांनी रोहित पवारांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना टोमणा लगावला आहे.

''लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही, त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून, मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे,''असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

“शरद पवार,अजित दादांवर टीका म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करण्यासारखे इति रोहित पवार.मात्र महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे स्वराज्य हाच जीव की प्राण मानणारी छत्रपती शिवाजी महाराजांची! पवार कुटुंबीयांनी कधी यावर सखोल चिंतन करावं”,असा सल्लाही सदाभाऊ खोत टि्वट करुन पवारांना दिला आहे.''ऊस हे आळशी माणसांचे पीक आहे,असे शरद पवार म्हणतात..ह्याच ऊसावर सुपीक राजकारणाचा मळा आपण फुलवला साहेब,''असा टोला खोतांनी लगावला.

देशात नुकत्याच काही ठिकाणी दंगली झाल्या.या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी (Rohit Pawar)भाजप (bjp) नेत्यांवर सडकून टीका केली आहे.''१९९३ सालच्या मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्या.श्रीकृष्ण आयोगानेही आदरणीय पवार साहेबांच्या खोटं बोलण्याची विशेष दखल घेत 'This is the example of statesmanship'अशा शब्दांत वाखाणणी केली. होय! म्हणूनच साहेबांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे,असे टि्वट रोहित पवारांनी केलं आहे.

''राज्यात दंगल भडकवण्याच्या ISIच्या प्रयत्नांना उधळून लावत आदरणीय पवार साहेबांनी तेव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती.पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना?'' असा सवाल रोहित पवारांनी भाजप नेत्यांना केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT