Clyde Crasto, NCP sarkarnama
मुंबई

भाजपने बिअर, वाईनरी कारखाने बंद करून पॅकबंद पाणी विकावे...

सरकारने मॉल Mall व सुपरमार्केटमध्ये Super market वाईनच्या Wine विक्रीला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र Maharahtra भाजपच्या BJP नेत्यांना क्लाईड क्रास्टो Clyde Crasto यांनी ट्वीटच्या माध्यमातून विरोध कसा कराल, असा सल्ला दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : तुम्हाला विरोधच करायचा असेल तर, भाजप नेत्यांनी आपल्या व कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅकबंद केलेले पाणी विकण्यास सांगा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपला दिला आहे.

राज्य सरकारने मॉल व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयावरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. सरकारने मॉल व सुपरमार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीटच्या माध्यमातून विरोध कसा कराल असा सल्ला दिला आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे महाराष्ट्रातील तुमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅक बंद पाणी विकण्याचा थेट सल्ला क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करुन दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT