CM Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis oath taking Ceremony : 'फडणवीस 3.0 सरकार'च्या शपथविधीतून भाजपचं दणदणीत शक्तिप्रदर्शन!

BJP Power in Fadnavis oath taking ceremony : पंतप्रधान मोदी अन् केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांसह भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीने सोहळ्याने वेधले संपूर्ण देशाचे लक्ष

Mayur Ratnaparkhe

BJP show strength in Mahayuti oath taking ceremony : महाराष्ट्रात महायुती सरकार पुन्हा एकदा अस्तित्वात आले आहे. आज मुंबईतील आझाद मैदानात या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे महाराष्ट्रात आता 'फडणवीस 3.0 सरकार' अस्तित्वात आले आहे. तर या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपचंही दणदणीत शक्तिप्रदर्शन दिसून आलं.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड जनादेशानंतर महायुतीचा हा शपथविधी सोहळाही अतिशय भव्यदिव्य झाला. या सोहळ्यास राजकीय, उद्योग, क्रीडा, सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. याशिवाय हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हा शपथविधी सोहळा बघण्यासाठी मैदानावर दाखल झालेला होता.

तर या महाशपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा अन्य केंद्रीयमंत्री खासदार, आमदार, राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेते, पदाधिकारी अन् शेकडो भाजप कार्यकर्ते हजर होते. त्यामुळे या शपथविधीवर भाजपची एक वेगळीच छाप दिसून आली. तसेच शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी अनेक भाजप कार्यकर्त्यांनी एक है तो सेफ है असा मजूकर लिहिलेले टी शर्ट घातल्याचेही दिसून आले होते.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची अन् एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा भाजपासाठी यासाठी देखील महत्त्वाचा होता, कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच भाजपने विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत.

तर या ग्रॅण्ड शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकाच गाडीमधून मंत्रालयात गेले. त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर फडणवीस सरकारची पहिली कॅबिनेट बैठक सुरू झाली. तत्पुर्वी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.

(Edietd by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT