BJP Maharashtra president Ravindra Chavan shares a heartfelt anniversary post for his wife on completing 25 years of marriage. sarkarnama
मुंबई

Ravindra Chavan : '...हे शब्दाने कधी बोललो नसेन', रवींद्र चव्हाणांची पत्नीसाठी खास पोस्ट, मांडला 25 वर्षांचा प्रवास

Ravindra Chavan Emotional Post Wife : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

Roshan More

Ravindra Chavan News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसा निमित्त पत्नी सुहासी यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या पोस्टमधून त्यांनी 25 वर्षांचा प्रवास मांडला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'प्रिय सुहासी,आज आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस... तुला मनापासून शुभेच्छा!हा पंचवीस वर्षांचा काळ एखाद्या कादंबरीच्या प्रकरणांसारखा आज डोळ्यांसमोरून जातोय.'

'खुशी-सलोनीचे आई बाबा होण्याचं सर्वोच्च सुख लाभलं, राजकीय यशाचे सोहळे घडले, भावनिक सुख-दुःखाचे प्रसंग आले, नाट्यमय घडामोडी झाल्या. जीवनात स्थैर्य होतंच पण तरीही प्रवाही ठेवण्याचं श्रेय निर्विवादपणे तुझंच होतं. कारण सार्वजनिक जीवनात यशस्वी होत असताना त्या जीवनशैलीत एक वेग असतो, तुझ्यासारखा जोडीदार मिळाल्याने त्यातही आपण उत्तम बॅलन्स साधू शकलो.'

'माणसं जमवणं हीच माझी ऊर्जा आणि तोच माझा पिंड, पण हे घरच्यांसाठी कदाचित तापदायक ठरू शकतं. नावाप्रमाणेच नेहमीच 'सुहास्य वदनाने' ओळखी - अनोळखी पाहुण्यांसाठी आजही विचारपूस करण्याची रीत सुरु आहे हे विशेष आहे. हो खरंच आहे, सातत्याने २५ वर्षं हे न कंटाळता, दिवसरात्र आणि अनेकदा पहाटे किंवा अपरात्रीही हे तुला करावं लागलं, करावं लागतंय.... याची मला जाणीव आहे.... हे शब्दाने कधी बोललो नसेन.... पण मला त्याचा अभिमान आहे हे निश्चित! माणसं जोडताना अनेकदा तुला आणि राणी खुशीला हवा तितका वेळ देऊ शकलो नाही. पण तू कधीही तक्रार केली नाहीस. उलट आपल्या संसाराचा कणा होऊन सर्व धुरा सांभाळलीस, म्हणून हे शब्द सुचत आहेत.', असे चव्हाण यांनी पुढे म्हटले आहे.

...ही माझी फॅमिली पॉवर आहे

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, सुहासी, लेकींसोबत घराला घरपण देणं, कुटुंबाची काळजी वाहणं, पुस्तकं-कादंबऱ्या वाचणं हे तुझं आवडीचं क्षेत्र आणि तुझा ऊर्जास्त्रोतही. ते यापुढेही निरंतर सुरुच राहील, कारण त्यातच तू आनंदी आणि समाधानी आहेस. तुम्हा तिघींची, माय-लेकींची लेडीज स्पेशल टीम ही माझी फॅमिली पॉवर आहे.... त्यातच मला सुख समाधान आणि आनंद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT