Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच आज अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.
''जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार आहे. मी पक्षात राहणार असून इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही'', असं स्पष्टीकरण देत पक्ष सोडण्याच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्ण विराम दिला.
यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांचा भाजप प्रवेशाचा असा कुठलाही प्रस्ताव नाही, असं स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना दिलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ''अजित पवार यांच्या राजकीय प्रतिष्ठेला तढा जाईल असा कुठलाही विषय नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याबाबत चर्चा का होत आहेत मला माहित नाही. चर्चा या फक्त माध्यमांमध्ये होत आहेत. पण मी आज सांगतो की, याबाबतचा कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे पक्षात कुणी येईल तेव्हा याबाबत प्रश्न विचारा'', असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी यावेळी दिलं.
''अजित पवार यांच्याबाबत पाठिमागचा काही संदर्भ घेऊन त्याबाबत बोलणं हे योग्य नाही. अजित पवार यांच्याबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्याबाबत काही चर्चां होणं हे योग्य नाही. सध्या बाहेरच्या बाहेर चर्चा सुरू आहेत. मात्र, माझ्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. अजित पवार हे अस्वस्थ आहेत की नाही हे मला माहित नाही. माझी आणि त्यांची अद्याप भेट नाही'', असंही ते यावेळी म्हणाले.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.