Sudhir Mungantiwar, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचलं, म्हणाले..

सत्ताधारी पक्षावर (cm Uddhav Thackeray) भाजपने जोरदार टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर (cm Uddhav Thackeray) टीका केली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार तयारी केली आहे. सत्ताधारी पक्षावर (cm Uddhav Thackeray) भाजपने जोरदार टीका केली आहे. काल आमदार सुनील राणे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर (cm Uddhav Thackeray) टीका केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ''सरकार स्वतःला वाचवण्यासाठी इतरांना दोष देत आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की थांबले पाहिजे आता, राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे. स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. उद्या मध्यान्न भोजन मी बघितलं, विद्यार्थ्यांच्या आरोग्य उत्तम राहावं, उद्या तर हे नेते म्हणतील त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी त्यांना हर्बल वनस्पती सध्या शाळेतच द्या”

मुनगंटीवार म्हणाले, ''गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं.'' “आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे," असं म्हणत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

बंदुकीच्या गोळीचा 'तो' रंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही उच्चारला होता...

मुंबई : नबाब मलिक मुस्लीम (Nawab Malik) आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते, असे सांगणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण आठवावे. ज्या रंगाची गोळी आपल्या शरीराला स्पर्शून जाईल तो रंग हिंदुस्थानातून.. या आपल्या वडिलांच्या जगप्रसिद्ध वाक्याचा त्यांनी पुनरुच्चार केला होता, अशी आठवण भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊत यांना करून दिली आहे. तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म, असा खोचक प्रश्नही भातखळकर यांनी राऊतांना विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT