Sharad Pawar, Uddhav Thackrey, Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

BJP Taunt Uddhav Thackeray : भाजपचा ठाकरेंना टोमणा; आता कुणाची बाजू घेणार, पवार की आंबेडकरांची..?

Pawar vs Ambedkar : पवार-आंबेडकरांच्या परस्परविरोधी वक्तव्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो

BJP vs Uddhav Thackeray : सध्या राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit) सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वक्तव्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यांनी केलेल्या अनपक्षित विधानांमुळे राजकीय जाणकर मंडळीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

दरम्यान २३ जानेवारी रोजी वंचित आणि शिवसेनेची युती झाल्याचे अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या पक्षांशी जुळवून घेण्याचे कोणतेही संकेत प्रकाश आंबेडकर देत नसल्याचेही या काळात दिसून आले आहे.

युतीवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वंचित महाविकास आघाडीचा भाग झाल्याचे गृहीत धरून "ही गाडी चारचाकी झाल्याचा" उल्लेख केला होता. आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईबाबत वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन परस्परविरोधी विधाने केली आहेत.

त्या विधानांवरून आता भाजपने शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी भाजपने टोमणा मारून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं आहे. तर, आंबेडकरांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत उद्धव ठाकरे यांना टोमणा मारण्याची संधी चुकविली नाही.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अंमलबजावणी संचनालय (ED), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग (IT) यांचा गैरवापर करत नाही. त्यांच्या जागी मी असतो ना, तरी तेच केलं असतं, असेही आंबेडकर म्हणाले होते. आंबेडकरांच्या वक्तव्याला अगदी विरोधात शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधान केलं आहे. पवार म्हणाले, अलीकडे आम्ही पाहतोय की, तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे.

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट केलं आहे. त्यात उपाध्ये म्हणाले, "शरद पवार (sharad Pawar) म्हणातायत तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना त्रास दिला जातोय आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणतायत मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत. या विरोधाभासी वक्तव्यांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) कोणाची बाजू घेणार? त्यांची न घरका ना घाटका अशी परिस्थिती होणार?"

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानांमुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला (Vanchit) मिळण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि वंचितची युती किती काळ टिकणार, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT