मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'तून आज शिंदे गटावर (cm eknath shinde) टीकेची तोफ डागली आहे. (cm eknath shinde latest news)
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टातून निर्माण केलेली शिवसेना दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कपट-कारस्थानाचे घाव घालून कागदोपत्री संपवली. त्याकामी महाराष्ट्रातील एक शिंदे व त्यांच्या चाळीस गारद्यांची मदत घेतली. शिवसेना हे ज्वलंत नाव गोठवले गेले. बाळासाहेब ज्याची रोज पूजा करीत ते धनुष्यबाण चिन्हदेखील गोठविण्यात आले. महाराष्ट्राची कवचकुंडलेच शिंदे व त्यांच्या गारद्यांनी दिल्लीच्या चरणी अर्पण केली,"अशी टीका शिवसेनेने केली आहे.
"शिंदे नावाचे गृहस्थ आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत व ते सत्तेच्या बळावर राज्यात प्रतिशिवसेना स्थापन करू पाहत आहेत. हे म्हणजे मोगलांत सामील झालेल्या एखाद्या गद्दाराने ‘‘शिवराय कोण? हिंदवी स्वराज्याचे खरे मालक आम्हीच!’’ असा दावा करण्यासारखे आहे. महाराष्ट्रात दोन शिवसेना निर्माण करून दुष्मनांनी त्यांचे काम केले आहे. शिंद्यांनी हरून अल रशीदप्रमाणे वेषांतर करून संध्याकाळनंतर बाहेर पडावे व जनता आपल्याविषयी काय बोलतेय ते समजून घ्यावे," असा टोला 'रोखठोक'मध्ये लगावला आहे.
"मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’प्रमाणे होत आहे. ‘शिंदे’ नामाचा महाराष्ट्रातील इतिहास शौर्याचा व इमानाचा आहे, पण सध्याचे शिंदे हे महाराष्ट्राचे खलपुरुष ठरत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही," असा गंभीर आरोप शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला आहे.
शिंदे नावाचा एक इतिहास आहे. तो इतिहास इमानाचा आणि शौर्याचा आहे, पण आताच्या शिंद्यांमुळे अनेक शिंदे खजील झाले. संसदेत ‘गोडसे’ हा शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’ शब्द महाराष्ट्रात तिरस्करणीय, असंसदीय ठरेल काय? ‘लखोबा लोखंडे’स पर्यायी शब्द म्हणून सध्याच्या शिंद्यांचा उल्लेख होऊ शकतो. या घडीस एकनाथ शिंदे यांचे वर्तन महाराष्ट्रात सगळ्यात तिरस्करणीय ठरत आहे. ‘एकनाथ शिंदे’ हे नाव ‘most hated speech’ प्रमाणे ‘most hated name’ ठरत आहे. इतर सर्व निष्पाप, कर्तबगार शिंद्यांची क्षमा मागून हे लिहावे लागते. एका शिंद्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजिरावर खंजीर खुपसून शिंद्यांच्या इतिहासाला, परंपरेला काळिमा फासला आहे!
भाजप शिंदेंचा वापर ‘कॉण्ट्रक्ट किलर’प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय. हे लोकांना पसंत नाही. मुख्यमंत्रीपद हे यश नसून लाचारी व गुलामी आहे. महाराष्ट्र ते पाहतोय. पुन्हा शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह मिळताच त्या मशालीस आव्हान देण्यासाठी समता पार्टीचे लोक शिवसेनेच्या विरोधात उभे केले गेले. गेल्या अनेक वर्षांत समता पार्टी व त्यांची मशाल कोठेच नव्हती. हे सर्व आर्थिक उलाढालीचे व खोक्यांचे प्रताप आहेत. अशा कॉण्ट्रक्ट किलर्सचा राजकीय अंतही वाईट होतो. अशा वेळी खोके निरुपयोगी ठरतात याची प्रचिती लवकरच येईल. शिंदे, अद्यापि वेळ गेलेली नाही! स्वतःला आवरता आले तर बघा!!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.