मुंबई : महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. राज्यात आज निवडणूक झाल्यास पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील. भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळतील, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आला आहे.
आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांना जो कौल महाराष्ट्रातील जनतेने दिला, तोच या प्रश्नावर कायम राहिला आहे. पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील; त्याखालोखाल शिवसेनेला २४ टक्के जनाधार राहील. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शेवटी काँग्रेस असा कौल आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम आताही कायम आहे. आज निवडणूक झाल्यास शिवसेना 77, राष्ट्रवादी 59, काँग्रेस 40 आणि भाजप 104 जागा अशी स्थिती राहील, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आले आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली आहे. राज्याच्या इतिहासातील ही एक आगळी घडामोड होती. दोन वर्षे सरकार टिकेल का, अशी शंका व्यक्त केली जात होती. तीन पक्षांचे सरकार शंका लोकांना मान्य होईल का, अशीही शक्यता व्यक्त होत होती. आता सरकारला दोन वर्षे झाली याबद्दल जनतेला काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील सर्व घटकांचा कल जाणून घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.