Yogesh Tilekar Sarkarnama
मुंबई

Yogesh Tilekar Victory : फडणवीसांचे विश्वासू शिलेदार योगेश टिळेकर पहिल्या झटक्यात विजयी

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : विधान परिषदेत भाजपचे पुण्यातील हडपसरमधील माजी आमदार योगेश टिळेकर सर्वात आधी 26 मते घेऊन पहिल्या झटक्यात विजयी झाले आहेत. विधान परिषदेत टिळेकर यांच्या रुपाने भाजपने आपले खाते खोलले. विधान परिषदेत भाजपचे एकूण पाच उमेदवार असून सर्व विजयी होणार यासाठी भाजपने फिल्डिंग लावलेली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होता. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा वाद पेटण्याची शक्यता होती. मात्र ज्याचा आमदार त्याचा उमेदवार या नियमानुसार हडपसरची जागा अजित पवार गटाकडे जाणार आहे. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता होती.

त्यापूर्वीच चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विश्वासू माजी आमदार योगेश टिळेकर यांची विधान परिषदेत उतरवले. तसेच त्यांना निवडून आण्यासाठी फडणवीसांनी योग्य त्या सूचनाही आपल्या आमदारांना दिल्या. त्याचा परिणाम म्हणजे विधान परिषदेत पहिला निकाल हा टिळेकरांचा लागला. त्यांनी कोट्यापेक्षा जास्त मते घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी टिळेकर, अमित गोरखे यांना विधान परिषदेत संधी देऊन पुण्यातील विधानसभेचे गणित आताच सोडवण्याची चर्चा आहे. याचा फायदा भाजपला होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याची फडणवीसांची रणनीती आहे. विधान परिषदेत पहिल्या पसंतीची प्रत्येकी २३ मते टिळेकर आणि गोरखे यांनी घेतली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT