Dhiraj Thakur, Aditya Thackeray, Latest News
Dhiraj Thakur, Aditya Thackeray, Latest News Sarkarnama
मुंबई

शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; भाजप युवा मोर्चाचा नेता गळाला...

सरकारनामा ब्यूरो

उल्हासनगर : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे गट आणि भाजकडून शिवसेनेला रोजच धक्के बसत आहेत. त्यात आता शिवसेनेने देखील भाजपला एक धक्का दिला असून भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य धीरज ठाकूर यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यांनी आज (ता.१ ऑक्टोबर) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Dhiraj Thakur, Aditya Thackeray, Latest News)

ठाकूर यांच्या रूपाने उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह शिवबंधन बांधले आहे. आता त्यांच्या डोक्यावर बसायचंच, असा सल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना दिला. तर उल्हासनगर शहरात शिवसेना वाढीसाठी काम करणार असल्याचं वचन ठाकूर यांनी आदित्य यांना दिलं आहे. यावेळी उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे आणि ठाकूर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, धीरज ठाकूर यांच्या शिवसेना प्रवेशाने युवासेनेची ताकद वाढल्याची भावना बाळा श्रीखंडे यांनी व्यक्त केली. तर निवडणुकीपूर्वी अनेक भाजप पदाधिकारी हे शिवसेनेत येतील, असे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरींनी दिले.

यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, उल्हासनगर शिवसेनाप्रमुख राजेंद्र चौधरी, युवाधिकारी बाळा श्रीखंडे, उपजिल्हा युवा अधिकारी अॅड केतन नलावडे, विभाग प्रमुख सुरेश सोणावने, अनिल (लाल्या) कुंचे, उपविभाग प्रमुख राजु चिकणे, शहर समन्वयक राजेश कणसे, उपशहर अधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे, पप्पू जाधव, रमेश कांबळे, हरी पवार, रुपेश मोहिते, राकेश चिकणे, तुषार बांदल, प्रतिम पाटील यांच्यासह शेकडो जण उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT