Avinash Raut joins Shiv Sena
Avinash Raut joins Shiv Sena sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंचा भाजपला दणका; युवा मोर्चाच्या सचिवाने बांधले शिवबंधन

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महानगर पालिकांची प्रभाग रचना जाहीर होताच सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेची (Mumbai Municipal Election) निवडणूक शिवसेनेसाठी (ShivSena) प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यासाठी युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले आहेत. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अविनाश राऊत यांना शिवसेनेत घेत भाजपला (BJP) धक्का दिला आहे.

राऊत यांनी आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे यांनी मुंबईतील प्रभाग रचनेचा आढावा घेत निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले पूर्व, सांताक्रूझ खार दांडा आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.

विले पार्ले पूर्व विधानसभा हा भाजप आमदार पराग अळवणी यांचा आहेत. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ आशिष शेलार यांचा आहे. या मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आदित्य यांनी मार्गदर्शन करताना आपण कोरोना काळामध्ये चांगले काम केले. मात्र, आता निवडणुका लागणार आहे. त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचत त्यांच्या प्रश्नांना न्याय द्या, असे सांगितले. राज्य सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा असा आदेशही त्यांनी दिला. या वेळी आदित्य ठाकरेंसह परिवहन मंत्री अनिल परब आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई व विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलाता आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही मागच्या आठवड्यात देखील बैठका घेतल्या आहेत. त्यातील रिपोर्ट आम्ही पक्ष प्रमुखांना देत आहोत. बिगुल वाजेल तेव्हा वाजेल आम्ही कायमच पक्षाचा आढावा घेत असतो. सोमवारी राज्यभरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत त्यांना विचारले असते ते म्हणाले, मी विद्यार्थ्यांना सांगेन धीर धरा योग्य तो निर्णय आम्ही घेउ, असे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT