BJP Chicken Banner : Sarkarnama
मुंबई

BJP Chicken Banner : भाजपचा 'कोंबडी वाटप' बॅनर व्हायरल; लोकांची मात्र निराशा, मोकळ्या हाताने आले परत..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबईच्या प्रभादेवी (Prabhadevi) भागात लावण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एका बॅनरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गटारी अमावस्येचं (Gatari Amavasya) निमित्त साधून नागरिकांना चक्कं कोंबडी वाटप करण्याच्या आशयाचा हा बॅनर होता. १५ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रभादेवी नाका येथे हे कोंबडी वाटप केलं जाणार असल्याचा दावा या बॅनरवर केला गेला होता. (Latest Marathi News)

एका कोंबड्याच्या चित्रासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर सर्व जेष्ठ नेत्यांचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटो या बॅनरवर झळकताना दिसत होते. भाजपच्या ज्या कुणी नेत्याने हा बॅनर लावला होता, त्याला त्याची चूक कळली असावी, म्हणून शनिवारी सकाळी म्हणजेच कोंबडी वाटपाच्या आधीच बॅनर काढण्यात आला.

बॅनर काढण्यात आला असला तरी सोशल मीडियावर हा बॅनर तुफान व्हायरल झाला. या बॅनरची शहानिशा करण्यासाठी व मोफत कोंबडी मिळवण्यासाठी काही लोक शनिवारी सायंकाळी सहा वाजता वरळी नाका येथे पोहोचले. मात्र दुर्दैवाने त्यांच्या हाती कोंबडीच्या ऐवजी निराशाच आली. कोणा अज्ञात व्यक्तिने खोडसाळपणा म्हणून हा बॅनर लावल्याची, सारवासारव आत्ता भाजपच्या स्थानिक-संबंधित नेत्याकडून करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT