Rajya sabha election 2022| Devendra Fadanvis  
मुंबई

महाविकास आघाडीला पहिला झटका; हितेंद्र ठाकूरांची तीन मते भाजपकडे जाणार...

Rajya sabha election 2022| महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी बविआने सुरवातीला पाठिंबा दिला होता.

सरकारनामा ब्युरो

Rajya sabha Election latest news

मुंबई : राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पहिला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे बहुजन विकास आघाडी राज्यसभेत भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटूंबावर सध्या ईडीची टांगती तलवार असल्याने बविआ भाजपला (BJP) मतदान करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील हे भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार आणि पालघरकडे वळवले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे. वसई-विरार महानगरपालिका निवडणूकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची शिवसेनेमुळे डोकेदुखी वाढली आहे. या कारणांमुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी बविआने सुरवातीला पाठिंबा दिला होता. ठाकूर यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वादग्रस्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली होती. तेथे त्यामुळे या दोन्हींतील संघर्ष होताच. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नसल्याचे लक्षात येताच ठाकूर हे महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मोकळे झाल्याचे तेव्हा बोलले जात होते.

सेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यानंतर सेनेने येथे विस्तारासाठी आणि आपली ताकद वाढविण्यासाठी जोर लावला. त्यातही येथे आतापर्यंतचा राजकीय सामना हा शिवसेना विरुद्ध ठाकूर असाच राहिला. त्यामुळे सत्ता आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणे सेनेला शक्य नव्हते. त्यातही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले. सत्ता आल्यानंतर सेनेने त्रास दिला, अशी बविआची मनोभूमिका झाली आहे. या साऱ्या परिस्थितीत बहुजन विकास आघाडी काय निर्णय घेणार, याचे औत्सुक्य राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT