Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|  
मुंबई

विधान परिषद सभापतिपदासाठी भाजपची नवी खेळी : राम शिंदेंना असे बसवणार पदावर

Vidhan Parishad | BJP| नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सर्वाधिक मलाईदार खाती भाजपने स्वत: जवळ ठेवली आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील सत्तांतर, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता विधान परिषदेचा सभापती बसवण्यासाठी आता भाजपच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सभापती निवडीपूर्वी राज्यपाल कोट्यातील १२ आमदार नियुक्त व्हावे यासाठीही भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. अशातविधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून (BJP) प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या विधानपरिषदेच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या विधानपरिषदेत भाजपकडे २४, तर शिवसेनेकडे ११ आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा आहेत. तसंच १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होतं आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सर्वाधिक मलाईदार खाती भाजपने स्वत: जवळ ठेवली आहेत. आता भाजपने विधान परिषदेच्या सभापतीपदासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. अशात मंत्रिमंडळात संधी न मिळालेले माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची वर्णी सभापतीपदी लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

रामराजे नाईक निंबाळकर सध्याचे विधान परिषदेचे सभापती

रामराजे नाईक निंबाळकर हे २०१५ पासून ते विधान परिषदेचे सभापती आहेत.१९९५ पासून ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. १९९५ मध्ये अपक्ष म्हणून फलटण मतदारसंघातून निवडून आल्यावर त्यांनी तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारला पाठिंबा दिला होता. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्रीपद भूषविले. मात्र १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर त्यांनी राष्ट्र्वादी पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्याही मंत्रिमंडळात त्यांनी महसूल व मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT