Ramdas Athawale-Narendra Modi

 

Sarkarnama

मुंबई

जनतेचे आशिर्वाद, पुण्य कर्मामुळेच पंतप्रधान मोदी मोठ्या संकटातून वाचले..

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होता कामा नये यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, असेही आठवले यांनी म्हटले आहे. (ramdas athawale)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अक्षम्य चुक पंजाब सरकारने केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास जिंकत चांगले काम करीत आहेत. (Punjab) त्यामुळे जनतेचे आशीर्वाद सदैव पंतप्रधान मोदींचे (Naredndra Modi) सुरक्षा कवच ठरत आहेत.

पंजाब भटिन्डा येथे पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेत मोठी चूक झाली असल्याने जीवावर आलेल्या संकटातून ते केवळ जनतेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्य कर्मामुळे सहीसलामत राहिले. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्या सुरक्षेत चूक होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ठरतो.

आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होता कामा नये यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, असेही आठवले यांनी म्हटले आहे. पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्यामुळे त्यांचा ताफा भटिंडा शहरापासून काही अंतरावरील एका पुलावर वीस मिनिटे थांबवाव लागला होता.

तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनकांनी रस्ता अडवून ठेवला होता. या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काॅंग्रेसची सत्ता असलेल्या पंजाब सरकारच्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधानांचा जीव धोक्यात आला होता, असा आरोप देखील भाजपकडून करण्यात आला.

हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. रामदास आठवले यांनी देखील या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT