BMC officer Mahesh Patil News Sarkarnama
मुंबई

BMC News: जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; BMC अधिकारी महेश पाटील निलंबित

BMC Assistant Commissioner Mahesh Patil Suspension News: अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांच्या 16.24 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: बीएमसीमधील (BMC) सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याविरोधात बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffrey) यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी तब्बल 16.24 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे . या प्रकरणी महेश पाटील यांना निंलबित करण्यात आले आहे.

खार पोलिसांनी महेश पाटील यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आला आहे. महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हबीबा जाफरी यांना मुंबईतील वांद्रे परिसरातील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या परताव्याचे आणि भरघोस नफ्याचे आमिष दाखवले होते. या प्रकल्पातून मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे आश्वासन देत त्यांच्याकडून तब्बल 16.24 कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, या व्यवहारासाठी आरोपींनी बनावट आणि खोटे कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर केल्याचेही समोर आले आहे. गुंतवणुकीनंतर अपेक्षित परतावा न मिळाल्याने आणि फसवणूक झाल्याचा संशय आल्याने हबीबा जाफरी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश पाटील फरार झाल्याचे सांगितले जात असून, पोलिसांना अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाचे गांभीर्य आणि फसवणुकीची मोठी रक्कम लक्षात घेता तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेची विविध पथके सध्या मुंबईसह अन्य ठिकाणी छापेमारी करत असून, महेश पाटील आणि इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर बीएमसी प्रशासनाने तातडीने कारवाई करत महेश पाटील यांना निलंबित केले आहे. निलंबनाचा अधिकृत आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. तो रविवारी, 7 जून रोजी त्यांना बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई पोलिसांनी गुरुवारी उद्योगपती निशित पटेल यांना 16 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली असून, या प्रकरणात बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचेही आरोपी म्हणून नाव नमूद केले आहे

काय आहे प्रकरण?

हबीबा जाफरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वांद्रे पश्चिम येथील पुनर्विकास प्रकल्पात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. महेश पाटील यांनी स्वतः या प्रकल्पाची माहिती देत “सरकारी पातळीवर सर्व काही क्लिअर” असल्याचा विश्वास दिल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी सरकारी नोंदणीची कागदपत्रे दाखवत हा प्रकल्प सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर चेक, रोख रक्कम, विदेशी चलन आणि महागड्या घड्याळांच्या स्वरूपात तब्बल 16 कोटींपेक्षा जास्त रक्कम उभी करण्यात आली. मात्र पैसे घेतल्यानंतर ना घरे मिळाली, ना गुंतवणूक परत मिळाली. त्यामुळे अखेर जाफरी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT