BMC Commissioner News Sarkarnama
मुंबई

BMC Commissioner News: महापौरांसोबत मुंबई महापालिकेला मिळणार नवे आयुक्त; पती-पत्नीचे नाव चर्चेत

Who Is Mumbai Municipal Commissioner? . दोन महिन्यानंतर सध्याचे आयु्क्त भूषण गगरानी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कोण विराजमान होणार यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Mangesh Mahale

Mumbai BMC Commissioner News: मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार यासाठी राजकीय घडामोडी सुरु आहेत. सुमारे साडेतीन वर्षांनंतर मुंबईला महापौर मिळणार आहे.

महापौरासोबत आता मुंबई महापालिकेचे आयुक्त कोण होणार याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. दोन महिन्यानंतर सध्याचे आयु्क्त भूषण गगरानी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कोण विराजमान होणार यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात देशातील सर्वात श्रीमंत महापालिका महौपार पदाचे नाव समोर येईल. अशातच नवे आयुक्त कोण होणार याबाबतची माहितीही लवकरच समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

1990 च्या बॅचचे सनदी अधिकारी भूषण गगरानी हे मार्च 2024 पासून मुंबईचे आयुक्त आहेत. महापालिकेवर प्रशासन म्हणून भूषण गगरानी यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. ते मार्च 2026 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत.

कोण असणार गगरानी यांचे उत्तराधिकारी

मिलिंद म्हैसकर( Milind Jayant Mhaiskar) हे मुंबईचे नवे आयुक्त होणार अशी चर्चा सध्या प्रशासकीय आणि मंत्रालयाच्या वर्तुळात सुरु आहे.  1992च्या बैचचे अधिकारी असलेले मिलिंद म्हैसकर यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी-टेक केले आहे. हे महाराष्ट्रीय आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे एडीशनल चीफ सेक्रेटरी (फॉरेस्ट), रेवेन्यू एंड फॉरेंस्टची जबाबदारी सांभाळत आहेत.

मिलिंद म्हैसकर हे नोव्हेंबर 2028 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. बीएमसीच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली तर त्यांना मोठा कार्यकाळ मिळणार आहे. मिलिंद यांच्या पत्नी मनीषा म्हैसकर याही आयएएस अधिकारी आहेत. त्यांचेही नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी चर्चेत आहे. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत

भूषण गगरानी यांच्यापूर्वी 1989 बँचचे आयएएस अधिकारी इकबाल चहल हे मुंबईचे आयुक्त होते, सरकारने त्यांच्यावर मुंबई पोलिस गृहनिर्माण प्रकल्पाचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. पाच वर्ष त्यांच्याकडे ही जबाबदारी राहणार आहे. मे २०२० ते मार्च २०२४ या कार्यकाळात ते बीएमसीचे आयुक्त होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT