bmc Sarkarnama
मुंबई

मुंबई महापालिकेच्या निवडणूका पुढे ढकलणार? प्रशासक येण्याची शक्यता

मुंबई महानगरपालिका सभागृह मार्च महिन्यात विसर्जित होणे अपेक्षित आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांचं वारं वाहत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या निवडणूका होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येक पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. जरी वर्षाच्या सुरुवातीला या निवडणूका होणार असल्या तरी मुंबई महापालिकेची निवडणूक मात्र पुढे जाण्याची शक्यता असून या ठिकाणी काही काळासाठी इथे प्रशासक येण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिका सभागृह पंचवार्षिक योजनेनुसार मार्च महिन्यात विसर्जित होणे अपेक्षित आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूका घेऊन नवीन सभागृह अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पण या निवडणूकांना विलंब लागू शकतो. कारण राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महापालिकेत ९ नगरसेवकांची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकसंख्या वाढल्यामुळे या जागा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे.

मात्र या जागा वाढवत असताना सर्व प्रभागात लोकसंख्येनुसार प्रभाग रचना होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व प्रभागांचा लोकसंख्येनुसार नवीन प्रभाग रचना करून कच्चा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. या अहवालात सुधारणा करून अंमलबजावणी होण्यास विलंब होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. असे झाल्यास निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पालिकेकडून प्रभाग आरक्षण सोडतीला थोडा वेळ लागले. ही सोडत काढल्यानंतरच निवडणूका होणार आहेत. एकूणच सगळ्या प्रक्रिया पाहता मुंबई महापालिकेच्या निवडणूका काहीशा उशिराने होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT