BMC Election 2026 Sarkarnama
मुंबई

BMC Election Result 2026 : मुंबईत शिंदेंच्या आजी-माजी खासदारासह तीन दिग्गज नेत्यांना मोठा धक्का; ठाकरे, काँग्रेसने चारली धूळ

Mumbai Municiple Election Result: लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिंदेसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनाही झटका बसला आहे.

Rajanand More

मुंबई महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी घेतली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये महायुतीचे तब्बल ८५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर ठाकरे बंधूंना ६७ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे असले तरी काही धक्कादायक निकालही लागले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे त्यांनी आजी-माजी आमदार, खासदारांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात तिकीटे दिली होती. मात्र, बहुतेकांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. शिंदे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर पराभूत झाले आहे.

सरवणकर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी ५८२ मतांनी पराभूत केले आहे. मुंबईतील प्रभाग 194 मध्ये या दोघांमध्ये काँटे की टक्कर होती. निशिकांत शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आहेत. मनसे नेते संतोष धुरी यांनी हा मतदारसंघ उध्दव ठाकरेंना गेल्याने नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिंदेसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनाही झटका बसला आहे. त्यांच्या कन्या दीप्ती वायकर या पराभूत झाल्या आहेत. त्यांना ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार लोना रावत यांनी तीन हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले.

शिंदेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे पराभूत झाल्या आहेत. राहुल शेवाळे यांनाही लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. आता महापालिका निवडणुकीतही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. वैशाली शेवाळे या धारावी येथील प्रभाग क्रमांक १८३ मधून उमेदवार होत्या. त्यांना काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी पराभवाचा झटका दिला. या मतदारसंघात ठाकरे बंधूंकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार पारुबाई कटके या होत्या. हा मतदारसंघा खासदार वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT