Kishori Pednekar & Chandrakant Patil
 Kishori Pednekar & Chandrakant Patil sarkarnama
मुंबई

चंद्रकांतदादा मी पण शिवसैनिक व मराठ्याची औलाद आहे, उगाच डिवचण्याच्या प्रयत्न करु नका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप व भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यांच्या या टीकेला आज (ता.24 जानेवारी) पेेडणेकरांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाटलांना इशारा दिला आहे. पेडणेकर म्हणाल्या, पाटील यांच्यावर मी काहीही बोलणार नाही हे आधीच सांगितले आहे. मात्र, जर ते बोलत असतील तर मी पण शिवसैनिक असून मराठ्याची औलाद आहे, माझ्यात पण एक मराठा लाख मराठा दौडतो. उगाच डिवचण्याच्या प्रयत्न करु नका, अश्या शब्दात त्यांनी पाटलांवर हल्लाबोल केला.

पेडणेकर म्हणाल्या, तुमच्या वाटेला आम्ही येणार नाही. मात्र तुम्ही आमच्या वाटेला आलात तर आम्ही अजिबात सोडणारही नाही. मला टीका करणाऱ्या विरोधकांची किव करावीशी वाटते. विरोधकांना खुले चॅलेंज आहे जी आत्ता निविदा आली आहे ती 92.52 कोटी आणि 94.42 कोटींची आहे. या किमतीत तुम्ही निविदा घेऊन या तुमचे स्वागत आहे. स्वीकारा आमचे चॅलेंज, असे खुले आव्हान त्यांनी विरोधकांना त्यांनी केले. तसेच, गुजरातमध्येही 264 कोटी खर्च पेंग्विनसाठी येत आहे. तेथे 6 पेंग्विन आणले होते. आता त्याठिकाणी 5 पेंग्विन आहेत. त्यातील एक पेग्विंन मृत झाला आहे. तिकडे पण नागरिकांचे पैसे आहेत ते योग्य खर्च होत आहेत का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून विरोधक हे राणी बागेच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत. यावर त्या म्हणाल्या की, विरोधक भ्रष्टाचार झाला असा आरोप करतात. मात्र, भ्रष्टाचार झाला तर सिद्धही करा, अशी हात जोडून त्यांना विनंती आहे. आपण कायदे मानतो तुम्ही आरोप सिद्ध करा राजकीय, प्रशासनातील कोणीही असुद्या त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आव्हान त्यांनी विरोधकांना केले. तसेच, आज विरोधी पक्ष कमी आणि वैरत्व जास्त झाले असून राजकीय पातळी खालावली जात आहे. त्यामुळे अनेक तरुण राजकरणाला कंटाळले आहेत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT