Thackeray brothers Sarkarnama
मुंबई

MNS Performance : मनसेच्या सुमार कामगिरीने उद्धव ठाकरेंचं गणित चुकवलं; मॅजिक फिगर गाठण्यात 20 जागा कमी पडल्या?

BMC Results Uddhav Thackeray MNS : मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना सत्ता गमवावी लागली. जर मनसेची कामगिरी चांगली झाली असती तर निकाल वेगळा लागला असता.

Roshan More

BMC Results : मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र आले मात्र त्यांच्या युतीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 60 जागांवर लढणाऱ्या मनसेला अवघ्या सहा जागांवर विजय मिळवता आला. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या. मनसेच्या खराब कामगिरीमुळे मुंबईत सत्ताबदल होऊ शकला नसल्याचे विश्लेषण केले जात आहे.

मनसेच्या 20 जागा अजून वाढल्या असता तर ठाकरे बंधूंची युती 100 जवळ पोहोचली असती आणि काँग्रेसच्या 24 नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली असती, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.

एकनाथ शिंदेंचे 60 माजी नगरसेवक फोडले होते. त्याचा फायदा त्यांना झाला. 28 जागांवर शिंदेचे उमेदवार विजय झाली. शिंदेच्या याच 28 जागा भाजपला सत्तेच्या जवळ घेऊन गेल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या विजयात एकनाथ शिंदे हे देखील मोठा अडसर ठरले आहे.

मराठी विरोधात सर्व एकवटले

मराठीच्या मुद्यावर मराठी माणूस एकत्र झाला असे चित्र मुंबईत तयार झाले. मात्र, एकनाथ शिंदेंच्या कामगिरीमुळे मराठी मतदारांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, मराठी मतदारांमध्ये फूट पडली असताना विरोधी गुजराती, हिंदी भाषिक मतदार मराठीच्या मुद्याच्या विरोधात एकवटलेले दिसले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT