Bmc News
Bmc News Sarkarnama
मुंबई

BMC News : मोठी बातमी : मुंबई पालिकेची निवडणूक अजूनही का झाली नाही? उच्च न्यायालयाचा आयोगाला सवाल!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबई महानगर पालिका व राज्यातील २४ महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम अजूनही का घेण्यात आल्या नाहीत? असe सवाल मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला (State Election Comission) विचारले आहे. तसेच याबाबत प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका लिखित स्वरूपात स्पष्ट करावी, असे निर्देशही देण्यात आले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा प्रश्न पुढे आला आहे.

नियमितपणे दर पाच वर्षांनी निवडणुकींचा कार्यक्रम आखणे, या राज्यघटनेनं घालून दिलेल्या नियमाचं महाराष्ट्र निवडणूक आयोगानकडून उल्लंघन झाले आहे. तसेच, "आयोगाची ही कृती देशद्रोही प्रकारची आहे," या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत, मुंबईतील रहिवासी रोहन पवार या व्यक्तिने उच्च न्यायालयात आयोगाविरोधात याचिका दाखल केलेली आहे.

उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर काल (27 फेब्रुवारी) या प्रकरणी सुनावणी झाली. निवडणूक आयोगाकडून अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्यांकडून उपस्थित केला गेला.

राज्यात आागामी काळात विविध निवडणुका पार पडणार आहेत. पुढच्या वर्षी लोकसभा,राज्यसभा व विधानसभेच्या निवडणुका प्रस्तावित आहेत.मात्र याआधी मोठ्या महापालिकांच्या तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT