Actor Govinda Sarkarnama
मुंबई

Govinda Bullet Injury : बंदुकीतून गोळी सुटली अन् पायाला लागली, 'मिसफायर'नंतर गोविंदाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

Govinda Bullet Injury live update : गोविंदा यांच्या जीवाला कोणताही धोका नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता खुद्द गोविंदाने त्याच्या सर्व चाहत्यांना त्याच्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत.

Rashmi Mane

बॉलिवूड अभिनेते आणि शिंदे गटाचे नेते गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची घटना घडली आहे. स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी पायाला लागल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला आहे. स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली. मात्र आता त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गोविंदा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. आता खुद्द गोविंदाने त्याच्या सर्व चाहत्यांना त्याच्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत.

गोविंदाने हॉस्पिटलमधील क्लिप व्हायरल झाली आहे

गोविंदाने हॉस्पिटलमधून एक ऑडिओ मेसेज केला असून त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. अभिनेता म्हणाला- प्रणाम मी गोविंदा, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद आणि गुरुंच्या कृपेमुळे मी सुरक्षित आहे. मला गोळी लागली होती. ती आता काढण्यात आलेली आहे. गोविंदा म्हणाला - मी इथल्या डॉक्टरांचे आभार मानतो. आदरणीय डॉक्टर अगरवालजींचे आभार. तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थना सोबत आहेत. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार.''

गोविंदाची क्लिप व्हायरल

गोविंदाने हॉस्पिटलमधून एक ऑडिओ मेसेज जारी केला असून त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. अभिनेता म्हणाला- 'मी आता धोक्याबाहेर आहे. चुकून गोळी सुटली. आई- वडीलांचा आशीर्वाद. मी माझ्या डॉक्टरांचे आभार मानतो. माझ्या चाहत्यांचाही मी ऋणी आहे. गोविंदा म्हणाला - तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या कृपेने मारलेली गोळी आता काढून टाकण्यात आली आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

गोविंदाची प्रकृती आता स्थिर...

गोविंदा सध्या क्रिटि केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. गोविंदा यांच्या पायातून गोळी काढण्यात आली असून ही दिलासादायक बाब आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी टीना सध्या रुग्णालयात त्याच्यासोबत आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार गोविंदाला २ दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT