bomb threat at Maharashtra Vidhan Bhavan Sarkarnama
मुंबई

Bomb Threat Vidhan Bhavan : मोठी बातमी! विधानभवनात सर्च ऑपरेशन,बॉम्ब ठेवल्याचा धमकी; कर्मचाऱ्यांना रोखलं

Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनामध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने सर्च ऑपरेशन विधानभवनात राबवले जात आहे.

Roshan More

Bomb threat email Vidhan Bhavan update: विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधीमंडळात कार्यालयाला विधानभवनात बाॅम्ब ठेवल्याचा ईमेल मिळाला आहे. त्यामुळे तातडीने सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. विधीमंडळात असलेल्या आमदारांना देखील सुरक्षेच्या कारणाने बाहेर काढण्यात आले. तर, विधीमंडळात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेटवरच थांबण्यात आले आहे.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की, विधानभवनासह मुंबईतील चार महत्त्वाच्या ठिकाणी ही धमकी देण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेने दखल घेतली आहे. सुरक्षा अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्यात चर्चा झाली. विधानसभा 9.45 तर विधान परिषद 10 वाजता सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने तपासणी सुरू आहे.

स्टाॅक एक्सचेंज, मेट्रो, बँक यांना देखील बाॅम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. आवश्यक ती खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. बाॅम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू आहे. धमकीचा मेल 6.57 वाजता आल्याचे देखील सभापती शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT