Anil Deshmukh sarkarnama
मुंबई

देशमुखांकडे न्यायालयाकडून विचारणा ; वैद्यकीय कारणे सांगा, सुनावणी दोन आठवडे स्थगित

न्यायालयाने देशमुख यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी अटक केली. शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून त्यांचा ताबा घेतला. याप्रकरणी न्यायालयाने देशमुख यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने (bombay hc) 2 आठवड्यांसाठी तहकूब केली. देशमुख यांनी वैद्यकीय कारणामुळे आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी केली आहे. देशमुख यांना वैद्यकीय कारणे सांगण्यास न्यायालयाने सांगितले आहे, ज्याच्या आधारे ते त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करीत आहेत.

सीबीआयने यापूर्वी याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, अनिल देशमुखांचे निकटवर्तीय सचिव संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांनाही ताब्यात घेतले होते. वैद्यकीय चाचणी करून सीबीआयने देशमुख यांना अटक केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

खंडणीवसुलीच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच मास्टरमाईंड आहेत, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई उच्च न्यायालयातप्रतिज्ञापत्राद्वारे केला. देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला आणि पोलिस बदल्यांमध्ये हितसंबंध राखले, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

‘ईडी’ने देशमुख यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले असून या प्रकरणात देशमुख हेच मुख्य सूत्रधार आहेत, असा दावा केला आहे. ‘ईडी’च्या सहायक संचालक तासिन सुलतान यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT