मुंबई : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी मागील वर्षी अटक केली होती. या प्रकरणी धुळ्यातही राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे. यामुळे राणेंनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने राणेंना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
धुळ्यामध्ये राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण आहे. या प्रकरणी राणेंवर कारवाई होण्याची शक्यता होती. त्याआधीच राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी राणेंना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पोलिसांना त्यांच्यावर दोन आठवडे कोणतीही कारवाई करता येणार नाही.
राणे यांना मागील वर्षी 24 ऑगस्टला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात पुणे व नाशिकमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर राणे यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी कारवाईची तयारी सुरू केल्याची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. राणेंच्या अटकेबाबत आशिष शेलार त्यावेळी म्हणाले होते की, राणे यांच्या अटकेच्या प्रकरणात त्या आयपीएस अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव होता. परिवहन मंत्री अनिल परब हे गृहमंत्री नाहीत. मात्र, गृह खात्यात अनिल परब कसा हस्तक्षेप करतात, हे कालची घटना म्हणजे पुरावा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.