Bombay High Court Dia Mirza video Sarkarnama
मुंबई

Dia Mirza Video : भाजप आमदार अमित साटम, महापौर रितू तावडेंना हायकोर्टाचा दणका; दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचा 'BMC'ला आदेश

Bombay High Court rebukes BJP leaders over Dia Mirza firecracker awareness video and directs BMC to reupload deleted video on social Media : फटाके न फोडण्याच्या आवाहनावरून अमित साटम यांच्यासह भाजप नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपांवर न्यायालय नाराज; 'भारत धर्मनिरपेक्ष देश आहे' अशी आठवण करून देत राजकीय विधानांवर ओढले ताशेरे.

Pradeep Pendhare

Bombay High Court Dia Mirza video : फटाके न फोडण्याचे आवाहन करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे ओढले आहे.

हटवलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचे BMCला आदेश केला. उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आमदार अमित साटम आणि महापौर रितू तावडे यांना जोरदार दणका बसला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडिओवर टीका करणाऱ्या भाजप (BJP) नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, असे आवाहन दिया मिर्झाने या व्हिडिओच्या माध्यमातून केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) दिया मिर्झाची मदत घेत हा व्हिडिओ तयार केला होता. मात्र, भाजप नेत्यांनी या व्हिडिओला विरोध केल्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो हटवला होता. यावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला होता.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणीदरम्यान काही राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. "काही राजकारण्यांनी केलेल्या अनाठायी टिप्पण्यांमुळे आम्ही अस्वस्थ आहोत," असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तसेच, "भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे," याचीही न्यायालयाने राजकीय नेत्यांना आठवण करून दिली. याशिवाय, मुंबई महापालिकेने (BMC) हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करावा, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT