Renu Sharma, Dhananjay Munde sarkarnama
मुंबई

धनंजय मुंडे नैराश्याच्या गर्तेत, तणावामुळे ब्रेन स्ट्रोक ; आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

रेणू शर्मा हिच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या विरोधात काल (रविवारी) पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांच्यावर आहे. तर दुसरीकडे त्यांची बहिण रेणू शर्मा (Renu Sharma) हिच्या विरोधात खंडणीप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धनंजय मुंडेंकडून रेणू शर्माने खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर आहे. (Dhananjay Munde latest news)

मुंडेकडून खंडणी मागितल्या आरोपाखाली रेणूला २० एप्रिल रोजी इंदूर (मध्यप्रदेश) येथून गुन्हे शाखेनं अटक केली होती. मुंडेंकडून रेणूने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर आहे. रेणू शर्मा हिच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रेणू शर्माने केलेल्या छळाच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांना मानसिक तणाव आला होता, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. 13 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.धनजंय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे.

“खंडणीच्या मागणी आणि सततचा छळ यामुळे धनंजय मुंडे नैराश्यात गेले होते. त्यांना 12 ते 16 एप्रिल दरम्यान एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची हॉस्पिटलायझेशनची कागदपत्रे आणि त्याचा वैद्यकीय अहवालावरून हे उघड झालं आहे.” असे आरोपपत्रात म्हटलं आहे.

हवालामार्फत रेणू शर्माला 50 लाख रुपये आणि आयफोन दिल्याचे मुंडे यांनी आपल्या फिर्यादीत सांगितले होते. धनंजय मुंडेंच्या वतीने इंदूरमध्ये रेणूला पैसे दिल्याचे दोन हवाला ऑपरेटर्सनी आपल्या जबाबात स्पष्ट केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी इंदूर येथील विकासकाचे जबाब नोंदवले आहेत.

काय म्हटलं आहे आरोपपत्रात..

  • धनंजय मुंडेंकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप.

  • रेणू शर्माकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून तिच्या बँक खात्यांमध्ये मोठे व्यवहार झाले.

  • 2017 मध्ये उघडलेल्या बॅंक खात्यात मोठी रक्कम जमा झाली होती.यात फेब्रुवारीमध्ये फक्त 6,652 रुपये शिल्लक होते,

  • रेणूने फेब्रुवारीमध्ये इंदूरमधील नेपेनिया रोडवरील बीसीएम पार्कमध्ये सुमारे 54.2 लाख रुपयांना डुप्लेक्स खरेदी केले होते.

  • रेणूने खंडणीच्या पैशातून डुप्लेक्स खरेदी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT