Uddhav Thackeray : Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shivsena News: ठाकरे-शिंदेंकडून प्रतोदपदी दावा : चेंडू सभापतींच्या कोर्टात : बजोरिया की पोतनीस, कोणाची होणार निवड?

Thackeray Vs Shinde : उपसभापतींचा लागणार कस?

सरकारनामा ब्यूरो

Thackeray Vs Shinde : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. ठाकरे गटाला व्हीपसंदर्भात दोन आठवड्यांची न्यायालयीन संरक्षण मिळाले असताना, एकनाथ शिंदेंच्या (Shivsena) शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. यामुळे आता ठाकरे-शिंदे गट संघर्षाचा पुढचा अंक पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.

विधानसभेत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाने ठाकरे गट समर्थक आमदारांना व्हीप बजावल्यानंतर आता विधान परिषद शिवसेना पक्षावरही हक्क सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हालचाली सुरू केल्या आहेत. विधान परिषद शिवसेना पक्षाचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र लिहले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची पक्षाच्या प्रतोदपदी निवड करण्याचा ठराव मंजूर करण्यातआल्याचे शिंदेंच्या या पत्रात नमूद केले आहे.

मात्र शिंदेंच्या हालचालींनंतर आता ठाकरे गटाकडून ही घडामोडी घडून येत आहेत. विधान परिषदेतील प्रतोद पदासाठी ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांचं नाव उपसभापतींना पाठवण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये विलास पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याची माहिती असून, उपनेते पदासाठी सचिन अहिर यांचं नाव उपसभापतींकडे देण्यात आलेलं आहे.

यामुळे आता चेंडू उपसभापतींच्या कोर्टात आहे. कुणाच्या पत्राची सकारात्मक दखल घेऊन, उपसभापती गोऱ्हे कुणाची प्रतोद म्हणून निवड करतात हे पाहणे, महत्त्वाचे आहे. बजोरीया की पोतनीस कोणाची निवड प्रतोद म्हणून केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT