Uddhav Thackeray | Eknath Shinde
Uddhav Thackeray | Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

शिंदे-फडणवीस करणार ठाकरेंची कोंडी ; CAG करणार BMC च्या कारभाराची चौकशी

सरकारनामा ब्युरो

Mumbai:मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून घेण्यासाठी शिंदे-फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. ठाकरे गटाला पुन्हा झटका देण्याच्या तयारी शिंदे-फडणवीस सरकारने केली असल्याचे दिसते. (maharashtra government latest news)

कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग म्हणजेच (कॅन्टोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

विधीमंडळ अधिवेशनात मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. कोरोना काळात मुंबई महापालिकेत भष्ट्राचार झाल्याचा आरोप यापूर्वीही भाजपने केला आहे.

या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी त्यांचे नियमबाह्य पद्धतीने झालेले कामाचे वाटप हे सारे चौकशीच्या फेऱ्यात आणले जाणार आहेत.

कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी टेंडर प्रक्रिया न राबवता तातडीने सोयीसुविधा उभारण्याला आणि वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र या अधिकाराचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता.

त्यामुळे या आरोपतील सत्यता जनतेसमोर यावी यासाठी लवकरात लवकर कॅगमार्फत या सर्व प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने कॅगला दिले आहेत.

कोरोनाकाळात केंद्र उभारण्यातील गैरव्यवहार, दहिसर येथील जमीन खरेदी प्रकरण, आँक्सीजन निर्मितीचे प्रकल्प, पालिका अधिकाऱ्यांनी आपलीच कंपनी स्थापन करुन पालिकेचे कामे घेतली, आदी आरोपांची चौकशी आता कॅगमार्फेत करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT