mumbai
mumbai File pics
मुंबई

मुंबईची तुंबई होऊ नये, म्हणून ठाकरेंचा हा फॉम्युला यशस्वी ठरणार का ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संकटाला मुंबईकर सामोरं जात असतात. मुंबईची तुंबई होऊ नये, म्हणून काय करता येईल याची चर्चा नेहमीच होते, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई (mumbai)महापालिकेकडून अनेक प्रकल्प राबविले जात आहेत.

अंधेरीतील मिलन सबवे दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली जातो. ही समस्या दूर करण्यासाठी 'मिलन सबवे' याठिकाणी 'हिंदमाता फॉर्म्युला' राबवला जात आहे. त्यामुळे 'मिलन सबवे' पुरमुक्त होणार, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितले. मुंबईतील नालेसफाई कामाची पाहणी ठाकरे यांनी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईची भौगोलिक स्थिती कुठे उंच तर कुठे सखल आहे. त्यामुळे मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास आणि त्याच दरम्यान समुद्राला भरती आल्यास पाण्याचा निचरा करणं कठीण होतं, परिणामी पावसाचं पाणी या सखल भागांमध्ये साचते. मुंबईला विशेषतः पावसाळ्यात पुरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अनेक प्रकल्प राबवले जात आहेत .

हिंदमाताप्रमाणे 'मिलन सबवे' येथेही सखल भाग असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात येथे पाणी तुंबतं. ही समस्या दूर करण्यासाठी 'मिलन सबवे' येथे हिंदमाता फॉर्म्युला राबवला जात आहे.भूमिगत टाक्या बनवून पाण्याचा निचरा करण्याच्या हिंदमाता फॉर्म्युल्याचा वापर मिलन सबवेच्या ठिकाणी करण्यात येत आहे . मिलन सबवेमधील तुंबणाऱ्या पाण्यासाठी के-पश्चिम विभागातील आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपात पाणी साठवण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करण्यात येत आहे.

टाक्यांच्या बांधकामाला सुरुवात

  • दोन महिन्यांपासून 'मिलन सबवे' शेजारील या मैदानात टाक्यांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

  • मुसळधार पाऊस झाल्यास ४ ते ५ तास पाणी साठवता येतील या क्षमतेच्या या टाक्या तयार होणार आहेत.

  • पुढच्या वर्षापर्यंत या टाक्यांच बांधकाम पूर्ण होऊन मिलन सबवे पूर मुक्त होणार

  • मिलन सबवे शेजारील लायन्स क्लबच्या मैदानात ही टाकी उभारण्यात आली आहे

  • साठवण टाकीसाठी निव्वळ कंत्राट २७.७३ कोटी रुपयांना देण्यात आलं आहे .

  • २० हजार लिटर घनमीटर म्हणजे २ कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी आरसीसी स्लॅबने आच्छादित केली जात आहे .

  • या टाकीची ७० मीटर लांबी , ५५ मीटर रुंदी आणि ८.६ मीटर खोल असेल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT