Ganesh Naik Sarkarnama
मुंबई

भाजप आमदार गणेश नाईक अडचणीत? महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

राज्य महिला आयोगाने घेतली होती प्रकरणाची दखल

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : भाजपचे (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर सीबीडी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्या पीडित महिलेने नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाईक यांच्याबरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा आरोप एक महिलेने केला होता. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला. मात्र, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा, आरोप या महिलेने केला होता. मार्च 2021 मध्ये सीबीडी येथील नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॅालव्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती. असा आरोप करत महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पीडित महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नसल्याने संबंधित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना कारवाई कण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या होत्या. या बरोबरच गणेश नाईक यांनी स्वत: पुढे येऊन डीएनए चाचणी करावी, आणि याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

संबंधित पीडित ४७ वर्षांच्या महिलेने या प्रकरणी गणेश नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली होती. थेट पोलिस ठाणे गाठून पोलिसांपुढे तक्रारींचा पाढा वाचला होता. मात्र, गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीपुढे आपले गाऱ्हाणे मांडले होते. आम्ही गेल्या २७ वर्षांपासून 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहात आहोत. याच काळात आम्हाला एक मुलगा झाला आहेत. या मुलाला त्या नेत्याने हक्क देणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी ते टाळाटाळ करीत आहेत आणि आमच्यातील नात्याची वस्तुस्थिती मान्य करीत नाहीत, असा आरोपही त्या महिलेने केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT