Rashmi Shukla Tapping : Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Rashmi Shukla Tapping | राजकारण तापणार : 'सीबीआय कुचकामी, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार'; वडेट्टीवारांचा आरोप..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. याच आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात प्रचंड गाजले होते. याच प्रकरणावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. (Latest Marathi News)

फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी न सापडल्याने सीबीआयकडून क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गुन्हा खरा आहे, गोपनीय कागदपत्रे लीक झाली आहेत, मात्र या प्रकरणात आरोपींचा शोध लागत नाही, आरोपी सापडत नाहीत असा सीबीआयचा दावा होता. तो कोर्टाकडून मान्य करण्यात आला आहे. दरम्यान गोपनीय कागदपत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कशी आणि कधी गेली, हे समजून येत नाही, असंही सीबीआयने कोर्टाला सांगितलं आहे.

सीबीआयच्या या भूमिकेवर आता राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सीबीआयवरच अविश्वास व्यक्त केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, "आरोपी आम्हाला सापडत नाहीत असं सीबीआयचं जर म्हणणं असेल, तर हा आरोपींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. आरोपींना वाचवण्यासाठी सीबीआय असे प्रकार करणार असेल तर आता जनतेलाही सीबीआयवर विश्वास राहिला नाही. या देशातील तपास यंत्रणा कुचकामी झाली. सत्ताधारी, पंतप्रधान, सरकारच्या इशाऱ्यावर चालणारी ही सीबीआय ही संस्था आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे."

वडेट्टीवार यांच्या या आरोपावर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. "वडेट्टीवार नवे विरोधीपक्षनेते आहेत. काँग्रेस हायकमांडला त्यांना दाखवायला लागतं, मी सर्वात सक्रिय आणि सर्वात मोठा नेता आहे. सीबीआय, ईडी, तपास यंत्रणा यांच्यावर अविश्वास दाखवला तर उद्या या देशात काहीच राहणार नाही. लोकं भ्रष्टाचार करतील," असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT