mahant narendra giri  latest news
mahant narendra giri latest news sarkarnama
मुंबई

महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत सापडलं मोठं घबाड ; ५० किलो सोनं अन् तीन कोटींची रोकड

सरकारनामा ब्युरो

प्रयागराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीतून ३ कोटी रुपये रोख रक्कम आणि काही जमिनीची कागदपत्रे सीबीआयने (cbi) जप्त केली आहेत. खोलीतून सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद तयार करण्यात आली. (mahant narendra giri latest news)

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करत असलेले सीबीआयचे पथकाला काल (गुरुवारी) प्रयागराज येथील बागंबरी मठात पोहोचले होते. त्यानंतर त्यांना दागिने, काडतुसं सापडले. सापडलेले सोनं, पैसे, कागदपत्रे जे महंत बलवीर गिरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सीबीआयने याची व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी केली आहे. हा कक्ष आता मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पण, ज्या खोलीत महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह लटकलेला आढळला, ती खोली अद्याप उघडलेली नाही.

काल दुपारी मठातील महंत नरेंद्र गिरी यांची खोली उघडण्यासाठी सीबीआय आणि पोलिस प्रशासनाचे पथक दाखल झाले होते. त्यांनी यावेळी मठाचे सर्व दरवाजे आतून बंद केले होते. कोणालाही आत येऊ दिले जात नव्हते. वरच्या मजल्यावर जिथे खोली उघडली होती तिथे जाण्याची परवानगी नव्हती. नरेंद्र गिरी यांची सील केलेली खोली सीबीआय पथक, पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली.

महंत गिरी यांची खोली सुरू उघडण्यासाठी बाघंब्री मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयच्या पथकाने पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडली. प्रयागराज पोलिसांनी महंताच्या संशयास्पद मृत्यूनंतर मठातील दोन खोल्या सील केल्या होत्या.

महंत गिरी यांच्या खोलीत काय सापडले..

या खोलीतून तीन कोटी रुपये, हनुमानजींचं सोन्याचं मुकूट, ५० किलो सोनं, काही दागिने, जमिनीची कागदपत्रे, १३ काडतुसं आणि सुमारे ९ क्विंटल देशी तूप सापडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT