Maharashtra Political Crisis Live : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. ते मुंबईतील एमईटी संस्थेतून बोलत होते. (NCP Rebellion Separate Meetings)
राज्यात वर्षभरानंतर महाराष्ट्रात दोन जुलैला राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीतील नऊ आमदार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाची आज मुंबईत सभा पार पडली.
यावेळी बोलताना छगन भूजबळ म्हणाले की, भाजप बरोबर कसे गेले, जसे शिवसेनेसोबत गेलो तसे भाजपसोबत गेलो. पण आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार भाजपसोबत सत्तेत सामील झाले. मग आम्ही झालो तर काय झालं. आपली विचारधारा जी आहे ती कायम राहिली पाहिजे, तडजोड करणार नाही. तुरुंगातून बाहेर आल्यावरही अनेकांनी आमिष दाखवली पण आम्ही नाही गेलो. साहेबांना वाईट वाटण स्वाभाविक आहे. पण हे का झालं, शरद पवार आमच्यासाठी विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे.Separate Meetings of NCP
साहेबांबद्दल मला प्रेम आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांनाही वाईट वाटलं असेल, मी शिवसेनेत होतो, तेव्हा बाळासाहेब आणि मासाहेबांनाही असंच वाईट वाटलं असेल, तुम्ही धनंजय मुंडे यांना पक्षात घेतलं तेव्हा काका गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनाही असं वाईट वाटलं असेल, अशी टीकाही छगन भूजबळ यांनी यावेळी केली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.