Pankaj Bhujbal | Raj Thackeray | Kripashankar singh :  Sarkarnama
मुंबई

काल छगन भुजबळांवर टीका; आज मुलगा पंकज राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर!

Pankaj Bhujbal | Raj Thackeray | Kripashankar singh : भाजप नेते कृपाशंकर सिंह देखील राज ठाकरेंच्या भेटीला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल ठाण्यात 'उत्तर' सभा पार पडली. गुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेकांनी तारे तोडले होते, त्यांना उत्तर देण्यासाठी आजची सभा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले होते. यात बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) आणि जयंत पाटील, अजित पवार (Ajit Pawar), संजय राऊत (Sanjay Raut), शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर टीका केली. दरम्यान या सभेनंतर आता राज ठाकरे यांच्या घरी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

आज सकाळी भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जावून भेट घेतली. मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाची भूमिका घेत असल्याने कृपाशंकर सिंह यांनी भेट घेतली असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र केवळ नातीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मी गेलो होतो, राजकीय चर्चा काहीच झाली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील वेळ मागितली आहे. त्यांच्याकडून वेळ मिळाली तर त्यांनाही भेटुन पत्रिका देईन, असेही सांगितले.

कृपाशंकर सिंह यांच्याभेटीनंतर काहीच वेळात राज ठाकरे यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ यांचे पुत्र, माजी आमदार पंकज भुजबळ आणि त्यांच्या पत्नी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या भेटीमागे कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे नुकतेच आजोबा झाले असून त्यांना नातू झाला आहे. त्यामुळे अगदी सदिच्छा ही भेट होती, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

कालच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मंत्री जयंत पाटील, अजित पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांवर हल्लाबोल केला होता. यात राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावरही हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होती की, भुजबळांच्या संस्थेतील गैरव्यवहारामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिले नेते भुजबळ होते, अशी जोरदार टीका राज यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT