Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
मुंबई

अनिल देशमुख हाजिर हो! चौकशी समितीसमोर होणार झाडाझडती

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी गंभीर आरोप केल होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. आता या समितीने अटकेतील देशमुखांना हजर करण्याचा आदेश दिला असून, उद्या (ता.30) त्यांची झाडाझडती होणार आहे.

चांदीवाल समितीने देशमुखांना उद्या हजर करावे, असा वॉरंट बजावले आहे. उद्या देशमुखांना समितीसमोर हजर केले जाणार आहे. देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली असून, ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत ते आयोगासमोर जबाब नोंदवणार आहेत. यानंतर त्यांची उलटतपासणीही घेतली जाऊ शकते. यामुळे देशमुख उद्या काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

परमबीरसिंह हे आज 11 वाजता चौकशीसाठी समितीसमोर हजर झाले. ते आज पहिल्यांदाच चौकशी समितीसमोर हजर झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, कुठल्या साक्षीदाराची उलटतपासणीही मला करायची नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे देशमुखांना क्लिनचिटच मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परमबीरसिंह हे समितीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करीत होते. त्यांनी वकिलांच्या मार्फतही समितीला हजर राहू शकत नसल्याची माहिती दिली होती. देशमुखांवर केलेले आरोप ऐकीव माहितीच्या आधारे केल्याने समितीसमोर येण्याचा काही उपयोग नाही, अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी घेतली होती. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे सविस्तर बाजू मांडण्याचीही तयारी त्यांनी दाखवली होती. अखेर समितीने परमबीरसिंह यांना चौकशीला हजर राहावे, यासाठी समन्स बजावले होते. त्यांना 29 नोव्हेंबरला चौकशीस हजर राहण्यास बजावण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT