Gajanan Kirtikar| chandrakant Khaire
Gajanan Kirtikar| chandrakant Khaire  Sarkarnama
मुंबई

गजाभाऊंना म्हातारचळ लागलाय; खैरेंनी तोफ डागली...

सरकारनामा ब्युरो

Shinde-Thackeray Politics: "गजाभाऊंना म्हातारपणात म्हातारचळ लागलाय. दोनदा खासदार झाले होते. पक्षाने त्यांना पाचवेळा आमदार केलं होतं. मंत्रीपदही दिलं होतं. अजून काय हवं होतं. पक्षाने इतकं दिल्यानंतरही या वयात ते गद्दारांच्या बरोबर गेले. हे मला पटलं नाही." अशा शब्दांत ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी (11 नोव्हेंबर ) शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का आहे. पक्ष सोडल्यानंतर किर्तीकर यांच्यावर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

"गजाभाऊंनी पक्ष सोडला याचं मला खूप दु:ख आहे. ते आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात औरंगाबाद आणि जालन्यात शिवसेनेसाठी खूप काम केलं. आम्हाला त्यांनी घडवलं. त्यांना पक्षात काही गोष्टी खटकत होत्या तर त्यांनी सांगायला हवं होतं. पक्षात राहून मत मांडायला हवी होती. अशा गोष्टींसाठी पक्ष सोडल्याने मला खूप दु:ख झालंय, अशी खंत यावेळी खैरे यांनी व्यक्त केली.

गजाभाऊंनी बाळासाहेबांसोबत काम केलं होतं. दोनदा खासदार झाले होते. पक्षाने त्यांना पाचवेळा आमदार केलं होतं. मंत्रीपदही दिलं होतं. अजून काय हवं होतं. पक्षाने इतकं दिल्यानंतरही या वयात ते गद्दारांच्या बरोबर गेले. हे मला पटलं नाही." असही चंद्रकांत खैरेंनी म्हटल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT