Sanjay Raut, chandrakant patil
Sanjay Raut, chandrakant patil sarkarnama
मुंबई

चंद्रकांतदादा, पुढाकार घ्या, सोबत काम करु : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये जर पैसे घेऊन मतदान केलं तर मतदारांच्या मागे ईडी लागेल,'' असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी दिला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांच्या या सूचनेचं राऊतांनी स्वागत केले. ते माध्यमांशी बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमध्ये पैसे घेणाऱ्या जनतेच्याही ईडी चौकशी लागू शकते, असा इशारा रविवारी दिला आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP)आमनेसामने आले आहेत. या प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या मतदारांना पैसे वाटण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप केला. सोबतच हे पैसे घेतलेल्या मतदारामागे ईडीची चौकशी लागेल असा इशाराच दिला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राऊतांनी उत्तर दिलं.

''कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचीच कशाला, तर गोव्यातील पणजी व साखळी मतदार संघातही ईडी लावा. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालच्या काही मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे. येथेही ईडी लावणं गरजेचं आहे. उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला तेथेही ईडी चैाकशी लावली तर त्याचं स्वागत करु,'' असे राऊत म्हणाले. ''महाराष्ट्रातील नंतर बघू, ईडी चैाकशीची सुरुवात आधी निवडणूका झालेल्या पाच राज्यांतून करावी, चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतला तर खांद्याला खांदा लावून काम करु,'' असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.

''निवडणुकीच्या आधी पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाची ही पूर्व तयारी सुरु आहे. पण मी नागरिकांना सावध करु इच्छितो की, चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे १००० रुपये प्रतिमाणूस तुमच्या अकाऊंटला येण्याची सुद्धा ईडी चौकशी होईल. हे पैसे आले कुठून, आणि हे पैसे ज्याने पाठवले त्याने आणले कुठून,'' असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

मी ईडीला पत्र लिहित असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ''स्वतःचा बॅल्क मनी पेटीमच्या माध्यमातून मतदारांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. सोबतच १ हजार रुपयांच्या महोपायी नागरिकांनीही ईडी चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लावून घेवू नये,'' असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT