Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
मुंबई

चंद्रकांत पाटील म्हणाले, ईद राष्ट्रीय सण केव्हा झाला...

सरकारनामा ब्युरो़

मुंबई - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबई भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची बुस्टर डोस सभा आज आयोजित केली होती. या सभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ( Chandrakant Patil said, when is the national festival of Eid ... )

चंद्रकांत पाटील म्हणाले, आजच्या सभेत देवेंद्र फडणवीस कुठला पेन ड्राईव्ह ते ओपन करतात याची लोकांना उत्सुकता आहे. या सभेला बुस्टर डोस सभा म्हंटले जात आहे. बुस्टर डोस म्हणजे मुंबईच्या भाषेत धमकी. या अर्थाने आम्ही विरोधकांना सांगू इच्छितो की आता जुनी भाजप राहिलेली नाही. ते वाद सुरू झाले की सोडावॉटरच्या बाटल्या बाहेर काढतात. नवीन युगात त्यापेक्षाही चांगली हत्यारे आली आहेत. भाजपचे लोक घाबरत नाहीत. बुस्टर डोसचा दुसरा अर्थ कार्यकर्ते व नागरिकांना शक्ती प्रदान करणारा आहे. हिंदुत्ववाद्यांनी आता घाबरायचे नाही.

उद्धव ठाकरेंविषयी ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता सांगतात, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. त्यांना ही सांगण्याची वेळ का आली. लोक आता तुम्ही हिंदुत्ववादी नाहीत असे म्हणतील म्हणून ते रोज मी हिंदुत्ववादी आहे असे सांगत आहेत. माहिती अधिकारात माहिती मिळाली की, ईद हा राष्ट्रीय सण सांगण्यात येत आहे. ईद राष्ट्रीय सण केव्हा झाला. अक्षय तृतीयेला गावागावात शिवजयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तखानाची बोटे तोडल्याचा व अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे फ्लेक्स का काढण्यात आले. त्यात चुकीचे व अक्षेपार्ह काय आहे. शाहिस्तखानाची बोटे आपोआप तुटली का, शिवाजी महाराजांनी अफजलखानाला गुदगुल्या केल्या होत्या असे त्यांना वाटते का? तसे सांगा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

शिवाजी महाराजांनी एकही लढाई हिंदू विरोधात केली नाही. त्यांचे सगळे विचार गळून पडू लागले आहेत. त्यामुळे त्यांना हिंदुत्वादी आहे हे सांगावे लागत आहे. कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत हिंदुत्वादी जनतेला पंजासमोरील बटन दाबायला सांगत होते. ज्या पंजाला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला. त्यांनी सोनिया गांधींना पांढऱ्या पायाची म्हंटले होते, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या सभेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा, चित्रा वाघ, नितेश राणे आदींसह भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT