Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News
Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News sarkarnama
मुंबई

शरद पवारांच्या 'या' गोष्टीवर चंद्रकांतदादांना करायचीयं 'पीएचडी'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शरद पवार हे काय रसायन आहे, त्यांनी भल्या भल्यांना कामाला लावलं. पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर कसा खुपसला? त्याची 'पीएचडी' मी करणार आहे, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पा़टील (Chandrakant Patil) म्हणाले.

दरम्यान, पा़टील हे साम टीव्हीच्या सामर्थ्य महाराष्ट्राचे - वेध भविष्याचा - मंथन विकासाचे या विशेष कार्यक्रमात बोलत होते. (Chandrakant Patil, Sharad Pawar Latest News)

यावेळी पा़टील म्हणाले, ''मला पवारांच्या कर्तृत्वावर पीएचडी करायची नाही. तर त्यांनी भल्या भल्यांना कामाला लावलं. या विषयावर पीएचडी करायची आहे. त्यांनी सहकारी संस्था किती उभ्या केल्या ३३ त्याची सभासद संख्या किती 32 हजार, अशी पीएचडी मला नाही करायची'', असा खोचक टोला त्यांनी पवारांना लगावला.

ते म्हणाले, ''वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर खुपसत 39 लोकांना पवारांनी बाहेर काढलं. आता ते एकनाथ शिंदेंवर कशी टीका करू शकतात'', असे म्हणत पाटलांनी पवारांचा चिमटा काढला. ''त्यावेळी ते आव्हान करत म्हणाले होते, वसंतदादांना सोडा. मग आता ते एकनाथ शिंदेंवर कसं काय बोलू शकतात? मग त्यावेळी पेट्या होत्या की खोके?'' असा सवाल करत पा़टलांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पवारांना सुनावले.

दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात 50 खोक्यावरून टीका टिप्पणी सुरू आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर विरोधकांकडून सातत्याने 50 खोक्याची टीका होत आहे. एवढंच नाही तर शिंदे गटाने आता यावर न्यायालयात देखील जाण्याचा इशारा दिला. हाच मुद्दा उपस्थित करत आणि वसंतदादांचं सरकार पाडल्याची आठवण करून देत पवारांना (Sharad Pawar) डिवचलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT