Ashish Shelar
Ashish Shelar  Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : मुंबई जिंकून देण्याची जबाबदारी शेलारमामांवर...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार (ashish shelar) यांच्याकडे आली आहे. (Ashish Shelar latest news)

भाजपच्या या नियुक्त्यांमुळे राज्यात फडणवीसांच्या गटाला धक्का बसला असून, पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या समर्थकांना मोठ्या जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्या खांद्यावर भाजपनं मोठी जबाबदारी टाकली आहे. शेलार हे दुसऱ्यांदा मुंबईचे अध्यक्ष झाले आहेत.

सुमारे २० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची मोठे आवाहन आशिष शेलार यांच्यावर आहे. कॅबिनेट मंत्रीपदी शेलार यांना संधी दिली नसली तरी भाजपा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक पाहता मुंबई भाजपा अध्यक्षाची जबाबदारी दिली आहे.

राज्यात सत्तात्तर झाल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. विभागप्रमुख, शाखाप्रमुखांची बैठका सुरु आहे. शिवसेनेचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत असलेली मुंबई मनपातील सत्ता खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा जबाबदारी दिली आहे

कोण आहेत आशिष शेलार

शेलार हे मूळ गिरणगावच्या चाळ संस्कृतीतले आहेत. त्यानंतर वांद्र्यासारख्या कॉस्मो परिसरात वाढले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-अभाविप- भाजयुमो-भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळात ते मंत्रिमंडळातही होते. शिवसेनेशी उघड संघर्षाची भूमिका घेणाऱ्या नेत्यांमध्ये ते आघाडीवर आहेत.

2014च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून 26 हजार 911 मताधिक्याने विजयी तर सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा 26,550 मताधिक्य राखून विजयी झाले आहेत.

या पदावर होते कार्यरत‌

• दोन टर्म अध्यक्ष, मुंबई भाजपा

• आमदार वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघ

• माजी अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशन

• मुख्य प्रतोद, विधानसभा,

• माजी मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT