Chandrasekhar Bawankule, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

BJP Politics : हरियाणातील निकालावरून बावनकुळेंनी सांगितलं महाराष्ट्र विधानसभेचं गणित; म्हणाले, "महायुती सरकारला..."

Jagdish Patil

Haryana Elections Results 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. हरियाणामध्ये भाजप (Haryana BJP) आघाडीवर आहे तर काँग्रेस पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

निकालाच्या याच आकड्यांवरून महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशातील राज्यांना डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. ज्या प्रकारे हरियाणातील जनतेने आम्हाला कौल दिला.

असंच काहीसं चित्र आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळेल. आगामी काळात राज्यातील जनता महायुती (Mahayuti) सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले, "हरियाणा, जम्मू काश्मीरसह देशातील जनतेला हे कळून चुकलं आहे की, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पर्याय आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यातील जनतेला वाटतं की आपल्या राज्यातही मोदींचे सरकार यावे. त्यामुळे जनता विकसित भारतासह विकसित राज्यासाठी मोदींना साथ देत असल्याचं आजच्या निकालातून पाहायला मिळत आहे."

तसंच, पंतप्रधान मोदींसोबत (Narendra Modi) राहिलो, तरच राज्याचा विकास होऊ शकतो, असं जनतेला वाटतं. त्यामुळेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील नागरिकांनी भाजपला साथ दिली. महाराष्ट्राचा विचार केला तर 14 कोटी जनतेच्या विकासाचं आणि राज्याला विकासाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचं काम डबल इंजिन सरकारच स्वप्न पूर्ण करू शकतं. त्यामुळे महाराष्ट्रातही असेच काहीसे चित्र दिसेल, असंही बावनकुळे म्हणाले.

डबल इंजिनचे सरकार गरजेचे

तर, आगामी काळात महायुती सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान होईल. इथल्या जनतेला माहिती आहे की, राज्याच्या आणि जनतेच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार राज्यात असणे गरजेचे आहे.

ज्याप्रकारे हरियाणातील सरकारने आम्हाला कौल दिला, जम्मू-काश्मीरमध्ये देखील तसंच पाहायला मिळाले. हेच चित्र आता आगामी विधानसभा निवडणुकीत दिसेल, अशा शब्दात त्यांनी राज्यात महायुतीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT