मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर चेक पोस्ट करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील चेक पोस्ट लवकरत बंद होण्याची चिन्ह आहेत.
गृह विभागाने (home department) परिवहन विभागाला (transportation department) याबाबत पत्र लिहिले असल्याची माहिती समोर येत आहे.(Check post in Maharashtra will be closed news update)
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गृहविभागानं अभ्यास गटाची स्थापना केली आहे. तीन महिन्यात या अभ्यास गटाला आपला अहवाल सरकारला द्यावा लागणार आहे, याबाबतचा आदेश परिवहन विभागाला गृहविभागाकडून देण्यात आला आहे. सीमा तपासणी नाके बंद करण्याची कार्यपद्धती काय असावी? चेकपोस्ट बंद केल्याने राज्य सरकारवर काय आर्थिक बोजा पडेल, याचाही अभ्यास केला जाणार आहे.
केंद्र सरकारकडून आलेल्या तिसऱ्या परिपत्रकानंतरराज्यातील चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात ‘अभ्यास गटाची’ स्थापना करण्यात आली आहे. हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीच अभ्यास करुन एक अहवाल तीन महिन्यात सादर करणार आहे.
गृह विभागाच्या काढलेल्या आदेशानंतर परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय अभ्यास गट तयार केला जाणार आहे. या अभ्यास समितीमध्ये परिवहन विभागाचे उपायुक्त दिनकर मनवर, लेखा उपायुक्त, तुळशीदास सोळंकी, उपायुक्त राजेंद्र मदने आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.