Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal News : 'मनी लाँड्रिंग' प्रकरणी झालेल्या सुनावणीला छगन भुजबळ गैरहजर; काय आहे कारण?

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह इतर आरोपींवर 'मनी लाँड्रिंग' प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे. या दाखल 'पीएमएलए' खटल्यातील गुन्हा रद्द करण्यासाठी भुजबळ यांच्यासह इतरांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर आज (ता. १०) सुनावणी झाली.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वीच भुजबळ यांना 'क्लिनचीट' दिली आहे. त्यामुळे प्रमुख गुन्ह्यातून 'क्लिनचीट' मिळाल्याने, 'ईडी'कडून दाखल केलेल्या गुन्हात 'मनी लाँड्रिंग' प्रतिबंध कायद्यानुसार न्यायालयात खटला चालू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणातून क्लीनचीट द्यावी, अशी भुजबळ यांनी केलेल्या याचिकेत विनंती करण्यात आलेली आहे.

या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यासह ४९ आरोपी न्यायालयात हजर होते. या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या परवानगीने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गैरहजर होते. यावेळी भुजबळ यांच्या वकिलांनी अंतिम युक्तिवाद केला. तर हितेन वेणूगावकर यांनी 'ईडी'कडून युक्तिवाद केला.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याआधीच भुजबळ यांना 'क्लिनचीट' दिली आहे. यासंदर्भातील नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. त्या निर्णयाच्या आधारावर आमच्यावरील खटला रद्द करण्यात यावा अशी, मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सर्वात पहिली तक्रार 'अँटी करप्शन ब्युरो'च्या वतीने दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात 'क्लिनचीट' देण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने दाखल केलेल्या गुन्हा देखील आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे 'क्लिनचीट' देण्यात यावी अशी मागणी केली होती.

काय आहे प्रकरण ?

अंमलबजावणी संचलनालयाकडून १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर भुजबळ यांना भारतीय दंडविधान १९/१ काळापैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारला तब्बल ८७० कोटी रुपयांचा फटका बसल्याचा आरोप आहे. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडून सुरू आहे.

भुजबळ याच्याविरुद्ध 'मनी लाँड्रिंग'चे दोन गुन्हे दाखल आहेत. छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध 'ईडी'ने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे काळा पैसा बाळगल्याप्रकरणी १७ जून २०१५ रोजी 'मनी लाँड्रिंग'चे दोन गुन्हे दाखल केले होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामातील भ्रष्टाचार, कलिना येथील जमीन हडप करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT