Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar : 'मी अजितदादा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत! छगन भुजबळांनी बॉम्बच टाकला

Mahayuti Vs MVA : लोकसभेत महायुतीचा परफॉर्मन्स अत्यंत खराब झाला आहे. त्यातच खासदारकीपासून वंचित ठेवल्याने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत ज्येष्ठ नेते शरद पवारांचे काही खास शिलेदारही गेले. यात ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळांचा समावेश आहे. अजितदादांची साथ देणार्‍या भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद मिळाले.

आता मात्र ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर विचारले असता त्यांनी मी अजितदादांसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे सूचक विधान करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट होण्याची शक्यता आहे. लोकसभेत महायुतीचा परफॉर्मन्स अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे अजित पवार Ajit Pawar आणि शिंदे गटातील लोक महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यातच खासदारकीपासून वंचित ठेवल्याने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

भुजबळांनी मात्र ते कुणाच्याही संपर्कात नसून कुठेही जाणार नसल्याचे सांगून सुरू असलेल्या चर्चा खोट्या असल्याच्या एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. यावर विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत राहणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

छगन भुजबळांच्या Chhagan Bhujbal या सूचक विधानाने विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात काय-काय होणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भुजबळांनी राजकारणात जास्त काळ नाराज राहून चालत नाही. आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. मी विरोधातील कुणालाही भेटलो नसून इतर कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT