कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांची तीन मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपत आहे. पण त्यानंतरही ते राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत लवकर मुंबई (Mumbai) किंवा पुण्यात (Pune) घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता संभाजीराजे यांची राजकारणातील पुढील वाटचाल कशी असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Chhatrapati Sambhajiraje Latest News in Marathi)
संभाजीराजे यांनी मंगळवारी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी केवळ महाराष्ट्रच (Maharashtra) नव्हे तर दिल्लीत सक्रीय राहणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मुंबई किंवा पुण्यात पुढील वाटचालीबाबत लवकरच घोषणा करणार आहे. दिल्ली व राज्यातील दोन्ही ठिकाणचे राजकारण आवडतं. राजकारणात उतरायचं हे निश्चित आहे. दिल्ली किंवा महाराष्ट्र आता दोन्हीकडे मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढले आहेत.
महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की, शिवाजी महाराज, शाहू, फुलेंची विचार घेऊन दिल्लीत जायला हवे. तर दिल्लीतल्या लोकांची सुध्दा इच्छा आहे की, खऱ्याअर्थाने पुन्हा एकदा शिवशाहूंचा वंशज इथे आला आहे. इथेही त्यांची ताकद वाढायला पाहिजे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी यापुढे राजकारणात सक्रीय होणार आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितले.
दरम्यान, गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी सूचक वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेसमध्ये (Congress) आले तर त्यांचे स्वागत केले जाईल, असं म्हटलं आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे. मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमधून आमदार म्हणून चांगले काम केले आहे. संभाजीराजे आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते काँग्रेसमध्ये आले तर स्वागतच आहे, असं पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.